


T NEWS मराठी नेटवर्क –

अहेरी(प्रतिनिधी )सोमवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी माँ दुर्गेची स्थापना करण्यात आल्याने सर्वत्र भिक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. राजनगरी अहेरी येथील राजवाड्यातही दरवर्षीप्रमाणे माँ दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली. माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम व हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी विधिवत पूजा अर्चना करीत अहेरी विधानसभा क्षेत्रासह जिल्हाभरातील सर्वसामान्यांना सुखसमृद्धी लाभू दे, असे साकडे माँ दुर्गेकडे घातले.
राजवाड्यात दरवर्षी माँ दुर्गेची घटस्थापना करीत राज घराण्याची परंपरा जोपासली जात आहे. सोमवारी घटस्थापनेच्या दिवशी राजवाड्यात माँ दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली. पुजारीच्या मंत्रोपचारात माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम व हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या हस्ते पूजाअर्चना पार पडली. त्यांनी माँ दुर्गेचे दर्शन घेत अहेरी विधानसभा क्षेत्रासह जिल्हाभरातील शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांना सुख, समृद्धी लाभू दे अशी याचना माँ दुर्गेकडे केले. यावेळी हर्षवर्धन बाबा आत्राम यांनीही मातेची विधिवत पूजा अर्चना केली.



























