मद्दीकुंटा व चिंतारेवला येथून रेती (वाळू) वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे नागरिकांना त्रास -रस्त्याचा बाजूला उभा केलेल्या वाहनामुळे अपघात होण्याची शक्यता -अधिकाऱ्यांचे कानाडोळा

408

T NEWS मराठी नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी)तालुक्यातील मद्दीकुटा आणि चिंतरेवला नदी घाटांवरून रेती वाहून नेण्यासाठी सिरोंचा – कालेश्वर मार्गावर दोन्ही बाजुला ट्रकांची रांग लागत असल्याने या मार्गावर अपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मात्र याकडे स्थानीक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

सिरोंचा कालेश्वर मार्गावर रोजच ५० ते ६० ट्रकांच्या रांगा दिसून येत आहेत. दोन्ही बाजूने ट्रकांच्या रांगा राहत असल्याने अन्य वाहन चालकांना जिव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. मागील काही दिवसांपासून अंकिसा जवळ असलेल्या चिंतारेवुला येथील रेती घाट सुरू

झाले आहे. येथील रेती ट्रकमध्ये भरून ते थेट तेलंगाना येथे रवाना केले जात आहेत. एकीकडे सिरोंचा असरअल्ली राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था झाली आहे.

त्यातच क्षमतेपेक्षा अधिक रेती वाहून नेणाऱ्या ट्रकमुळे महामार्गाची अवस्था गंभीर होत असल्याने सर्वसामान्य लोकांना याच्या त्रास सहन करावा लागत आहे. हे ट्रक राष्ट्रीय महामार्गाने जाऊन चिंतलपल्ली गावाजवळ खाजगी धर्मकाट्यावर वजन करतात. वजन करताना ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रेती असल्यास ट्रक मधील रेती बाहेर काढल्या जात आहे. मात्र रेती धर्मकाट्याच्या बाजूला साठवली जाते. ठेकेदार सतत क्षमतेपेक्षा

जास्त रेती का भरत आहेत अशी विचारणा केली जात आहे. जास्तीची रेती वाहतुक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करावी तसेच धर्मकाट्यावर रेतीचे मोजमाप काटेकोरपणे करण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा शासनास दररोज लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here