


T NEWS मराठी नेटवर्क
गडचिरोली(विशेष प्रतिनिधी)
सिरोंचा तालुक्यातील चिंतलपल्ली येथील वनउपज तपासणी नाक्यावर १ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वनकर्मचाऱ्यांनी सागवानाची तस्करी उधळवून लावली होती़ या कारवाईत ५१ हजार ३३५ रुपयांचा सागवान माल जप्त करीत एका आरोपीस अटक केली होती़ सदर आरोपींची सखोल चौकशी केली असता या तस्करीत वनविकास महामंडळाचे (एफडीसीएम) एका कर्मचा-यास निलंबित करण्यात आले आहे़ या प्रकारामुळे ही केवळ तस्करी नव्हे वनविकास महामंडळातील भ्रष्ट कर्म असल्याचे स्पष्ट होत आहे़


१ ऑक्टोबर रोत्रीच्या सुमारास चिंतलपल्ली वननाक्यावर कार्यरत कर्मचा-यांनी पिकअप वाहनातून अवैधरित्या सागवान लठ्ठे जप्तीची कारवाई केली होती़ या कारवाईत ०.४३५ घनमीटर सागवानाचे पाच लठ्ठे व पिकअप वाहन जप्त करण्यात आले होते़ या कारवाईत संदीप दामोधर मडावी (३४) रा. कन्हाळगाव, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर या आरोपीस अटक करण्यात आली होती. या आरोपीची सखोल चौकशी केली असता सागवान तस्करीसाठी वापरात आलेले ट्रॅक्टर, दुचाकी, दोन चैन सो कटर मिशन व १० फुट लोखंडी संकल जप्त करण्यात आले़
विशेष म्हणजे, चौकशी दरम्यान आरोपी संदीप मडावी याने वनविकास महामंडळचा (एफडीसीएम) कर्मचारी वनरक जितेंद्र धर्मराव मडावी याचाही तस्करीत सहभाग असल्याची कबुली दिली. याप्रकरणी वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार संबंधित वनरक्षकास तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, ३ ऑक्टोबरपर्यंत बनकोठडी सुनावण्यात आली.
प्रकरणाचा तपास सिरोंचाचे क्षेत्र सहाय्यक एस.एस. निलम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आणखी काही एफडीसीएम कर्मचाऱ्यांचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एफडीसीएमच्या कोप्पेला क्षेत्रातील सागवानाच तोड –
आरोपींची सखोल चौकशी केली असता तस्करीसाठी नेण्यात येत असलेल्या गावान लठ्ठे आरोपींनी वनविकास महामंडळाच्या कोप्पेला नियतक्षेत्रातील खंड क्रमांक २३३ मधून अवैधरित्या सागवान तोड केल्याचे मान्य केले़ याअंतर्गत वन पथकातील कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला़






























