


T NEWS मराठी नेटवर्क-
मुलचेरा(प्रतिनिधी )राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या डि.बी.ए. अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी, भारत (रजि.) या साहित्यिक संस्थेच्या वतीने व यवतमाळ जिल्हा कमिटीच्या वतीने डि.बी.ए. चा पाचवा वर्धापन दिन तसेच काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा, राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ आणि राज्यस्तरीय कवी संमेलन आर्णी जि. यवतमाळ येथे डि.बी.ए. संस्थापक मनोज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 25 ऑक्टोबर 2025 ला बहुसांख्यिक साहित्यिकांच्या उपस्थित पार पडला.

त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष युवा विद्रोही कवी प्रभाकर देविदास दुर्गे (छायासूत) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या विचारमय लेखणीतून “चला मानसांनो… माणुसकी समजून घेऊ” अशी मानव जातीला प्रकाशमय करणारी, समाजाला प्रेरणादायी कविता सादर करत उपस्थित सर्व मान्यवर, साहित्यिक, रसिकांची मने जिंकली असता, त्यांचं सामाजिक योगदान, साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा घेत आयोजक, प्रायोजकांनी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तक, मानाचा पट्टा देऊन डि.बी.ए. राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक मनोज जाधव सर, डि.बी.ए.च्या आधारस्तंभ/संपादिका भावना खोब्रागडे मॅडम, कवी संमेलनाध्यक्षा प्रतिभाताई गेडाम , यवतमाळ जिल्हाध्यक्षा संध्या खरतडे मॅडम, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षा कुसुमताई मनवर , यवतमाळ जिल्हा सचिव संगीता कानिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

त्यांच्या या सत्काराबद्दल नातेवाईक, साहित्यिक सहकारी, मित्रपरिवार, गाववासीय, आप्तजन या सर्वांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





























