देसाईगंजच्या जनकल्याण यात्रेत जनसागर उसळला; २० हजारांहून अधिक नागरिक सहभागी -भव्य सभेत आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते नंदू नरोटे, बानय्या जनगाम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

692

देसाईगंजच्या जनकल्याण यात्रेत जनसागर उसळला; २० हजारांह

T NEWS मराठी नेटवर्क-
देसाईगंज(प्रतिनिधी )आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या जनकल्याण यात्रेला देसाईगंज येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या सभेला २० हजारांहून अधिक नागरिकांचा जनसागर उसळला होता. देसाईगंजच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सभा ठरल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. याच भव्य सभेत आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू नरोटे, सिरोंचा येथील नेते बानय्या जनगाम आणि ज्येष्ठ नेते मोहन पुराम यांच्यासह विविध पक्षातील शेकडो नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश केला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “आमच्या सरकारने लाडकी बहीण सारखी योजना सुरु केली आहे. शेतकऱ्यांच्या आणि ओबीसी समाजाच्या आम्ही सदैव पाठीशी आहोत. राज्यात अनेक कल्याणकारी योजना आमच्या सरकारने कार्यान्वित केल्या आहेत. १९९१ साली पहिल्यांदा निवडून आल्यानंतर आपण देसाईगंज तालुक्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे नागरिकांचा विविध प्रमाणपत्रांसाठी गडचिरोलीला जाण्याचा त्रास कमी झाला. ते पुढे म्हणाले, “देसाईगंज शहरात आजही प्रॉपर्टी कार्डचे अनेक प्रकरण प्रलंबित आहे. पेसाचा प्रश्नही आहेच. गेल्या ५० वर्षाच्या राजकीय जीवनात मी या भागातील अनेक नेते बघितले, पण त्यांनाही हे प्रश्न सोडविता आले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्हाला संधी दिल्यास हे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविणार,” असे आश्वासन आत्राम यांनी यावेळी दिले. “शहरात भव्य नाट्यगृह मीच मंजूर केले. यामुळे झाडीपट्टी रंगाभूमीला हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला सत्ता दिल्यास याहून अधिक विकास कामे आपल्या परिसरात करणार,” असल्याचेही आत्राम यांनी यावेळी सांगितले.
सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, प्रसिद्ध सिने अभिनेत्री माधुरी पवार, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम, डॉक्टर सोनल कोवे, नाना नाकाडे, लीलाधर भरडकर, संजय साळवे, युनूस शेख, रिंकू पापडकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, नेते व नागरिक उपस्थित होते.
काँग्रेस व आदिवासी विद्यार्थी संघाला मोठे खिंडार-
देसाईगंज येथे पार पडलेल्या या भव्य सभेत आदिवासी विद्यार्थी संघाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, सरपंच, पंचायत समिती सभापती, सदस्य यांच्यासह शेकडो नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामुळे आदिवासी विद्यार्थी संघाला मोठे खिंडार पडले आहे. प्रवेश केलेल्यांमध्ये आदिवासी विद्यार्थी संघाचे सरसेनापती नंदू नरोटे, भटेगावचे उपसरपंच ज्येष्ठ नेते मोहन पुराम, सिरोंचाचे अविसचे नेते बानय्या जंगम, मदन वट्टी, दौलत कुमोटी, ऋषी हलामी, बाबुराव मडावी, शालिक मडावी, सरिता वट्टी, देवनाथ पारसे, राजू आत्राम, सुमन नैताम, दिलीप नैताम, रेश्मा कातेंगे, बाबुराव कुळसंगे यांच्यासह उत्तर आणि दक्षिण गडचिरोलीतील शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here