


T NEWS मराठी नेटवर्क-
एटापल्ली (प्रतिनिधी) तालुक्यातील झारेवाडा गावातील बाजू हिचामी हे कॅन्सर या जीवघेण्या आजाराशी जीव तोडून लढा देत आहेत. उपचारासाठी लागणारा प्रचंड खर्च पाहता कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले होते. ही गंभीर परिस्थिती समजताच युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आणि स्वतः आर्थिक मदत करून हिचामी कुटुंबाला मोठा आधार दिला.

याचसोबत स्नेहा धर्म धर्मार्थ दवाखाना यांच्या माध्यमातून वारंगल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये संपूर्ण उपचाराची जबाबदारी उचलण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या निर्णयामुळे कुटुंबाच्या डोळ्यांत आशेचे नवे प्रकाश फुलले.

या मानवीय उपक्रमाचे एटापल्ली तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून, गरजूंच्या मदतीसाठी हात पुढे करणाऱ्या हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या कार्याला समाजातील युवा नेतृत्वाचा प्रेरणादायी आदर्श असे संबोधले जात आहे.
या प्रसंगी झारेवाडा येथील उपसरपंच उमेश हिचामी, चेतन हिचामी, सूरज जाधव, तिरुपती मडावी, योगेश तलांडे, आकाश राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.



























