कोडसेपल्ली येथे आमदार निधीतुन हातपंप मंजूर

113

T NEWS मराठी नेटवर्क-
अहेरी(प्रतिनिधी) तालुक्यातील कुरूमपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणारा मौजा – कोडसेपल्ली येथे आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम साहेब यांच्या स्थानिक आमदार निधी मधुन बोअरवेल मंजुर करण्यात आला आणि आता प्रत्येक्षात कोडसेपल्ली गावात सदर बोअरवेलची खोदकाम झालेला आहे.
म्हणुन आता मौजा – कोडसेपल्ली गावातील नागरिकांना पिण्याची पाण्याचा समस्या दूर होणार आहे.
यावेळी सदर बोअरवेल ची खोदकाम करतांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच – बालाजी गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते – पिंटू झाडे, डॉ. बाबू गाईन, चुंडू तलांडी, इरपा तलांडी सह कोडसेपल्ली गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here