भामरागड येथे महिलां व युवकांच्या आरोग्यरक्षणासाठी भव्य आरोग्य शिबिर -धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाने, हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांच्या पुढाकाराने उपक्रम यशस्वी

206

T NEWS मराठी नेटवर्क-
भामरागड(प्रतिनिधी )येथील अंगणवाडी केंद्रात महिलांच्या आणि युवकांच्या आरोग्याच्या जतनासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हा उपक्रम माजी मंत्री व विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाने, तसेच युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली अक्का आत्राम यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.
या शिबिरात नागरिकांची महत्त्वपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये
ब्लड ग्रुप तपासणी-
ब्लड शुगर तपासणी-
हिमोग्लोबिन तपासणी-
या चाचण्यांमधून महिलांना व युवकांना त्यांच्या आरोग्याविषयी आवश्यक माहिती मिळाली.
शिबिरादरम्यान स्नेहाधर्म डायग्नोस्टिक सेंटरचे वैद्यकीय कर्मचारी व तज्ञ प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी करत मार्गदर्शन देत होते.
नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले असून अशा शिबिरांची गरज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिकांच्या मते,“धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनामुळे आणि हर्षवर्धन बाबा तसेच डॉ. मिताली अक्का यांच्या पुढाकारामुळे आमच्या भागात आरोग्य सेवांचा लाभ मिळत आहे, ही आमच्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे.”
भामरागड परिसरात राबविण्यात आलेला हा उपक्रम आरोग्यजागरूकता वाढविणारा आणि समाजहितासाठी महत्वाचा टप्पा ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here