तालुक्यात वनहक्क सर्वेक्षण मोहीम उत्साहात -ग्रामस्थांचा मोठा सहभाग; मान्यवरांची महत्त्वपूर्ण उपस्थिती

110

T NEWS मराठी नेटवर्क-
एटापल्ली (प्रतिनिधी) तालुक्यातील आलेंगा, येडसगोंडी, बोडमेटा, पामाजिगुडा आणि हालूर या दुर्गम व आदिवासी बहुल गावांमध्ये वनहक्क कायद्यानुसार वनहक्क दावे तपासणी आणि सर्वेक्षण मोहीम उत्साहात पार पडली. अनेक वर्षांपासून वनहक्क प्रलंबित असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या अपेक्षेने या मोहिमेत सहभाग नोंदविला.

ही मोहीम माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात व युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

प्रत्यक्ष पाहणीसह सखोल सर्वेक्षण-गावांमध्ये झालेल्या सर्वेक्षणादरम्यान दावेदारांच्या शेतीचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्यात आले.
दावेदारांनी आपली कागदपत्रे, परंपरागत शेतीवरील ताबा, वारसाहक्क, जमीन नोंदी याबाबतची माहिती अधिकाऱ्यांना सादर केली.
ग्रामनिहाय समित्यांनी दावेदारांना मार्गदर्शन करत प्रक्रियेला गती दिली.

मान्यवरांची विशेष उपस्थिती- विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावर यांनी सर्वेक्षण स्थळांची पाहणी केली. ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी वनहक्क लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचवण्याची बांधिलकी व्यक्त केली.

R.O. कन्नाके -यांनी तांत्रिक मार्गदर्शन देत कागदपत्र छाननी व क्षेत्र सर्वेक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

राजूभाऊ नरोटे- माजी सरपंच जांबिया

लक्ष्मण भाऊ नरोटे- सामाजिक कार्यकर्ता (रा.का.पा)

गिरीश भाऊ नरोटी- सामाजिक कार्यकर्ता (रा.का.पा)

स्थानिक प्रशासनाची सक्रिय भूमिका गावडे– तलाठी, आलेंगा यांनी जमीन नोंदी व नकाशे तपासले.

बंडू वेलादी – वनरक्षक यांनी क्षेत्रातील सीमारेषा ओळखून देत सर्वेक्षणात मदत केली.

दिनेश पुंगाटी – पोलीस पाटील यांनी ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय साधून मोठा सहभाग सुनिश्चित केला.

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग-
आलेंगा, येडसगोंडी, बोडमेटा, पामाजिगुडा आणि हालूर या गावांतील शेकडो दावेदारांनी आपापल्या वनहक्क दाव्यांसाठी हजेरी लावली.
कित्येकांनी वर्षानुवर्षे कसत असलेल्या जमिनीचा तपशील दिला. काही ठिकाणी समित्यांनी प्रत्यक्ष शेतजमिनीवर जाऊन नकाशे व ताब्याची खातरजमा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here