


T NEWS मराठी नेटवर्क-
अहेरी (प्रतिनिधी )आदिवासी समाजाचे गौरव, महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टी येथील विद्यार्थिनी, दुबई येथे एशियन युथ पॅरा सुवर्ण पदक विजेता कु. श्वेता कोवे हिचा आदिवासी समाजाकडून सत्कार करण्यात आला.
सदर सत्कार हे आष्टी येथे झालेला गडचिरोली जिल्हा, आदिवासी साहित्य संमेलन मध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित संमेलनाचे उद्घाटक – राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तथा आदिवासी समाजाचे साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्था बल्लारपुरचे अध्यक्ष – प्रा. डॉ. विनायक तुमराम, संमेलनाचे अध्यक्ष – जेष्ठ नाट्यकर्मी पध्यश्री मा. परशुरामजी खुणे, वन वैभव शिक्षण मंडळ अहेरीचे सचिव – श्री बबलु भैया हकीम यांच्या सह आदिवासी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी आलेले मान्यवरचा उपस्थितीत कु. श्वेता कोवे हिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार करतांना, आदिवासी समाजाचे कार्यकर्ते – येरमनारचे माजी सरपंच – बालाजी गावडे, कमलापुरचे माजी सरपंच – संबय्या करपेत, माजी पंचायत समितीचे सदस्य – मंतय्या आत्राम, कोडसेलगुडम गावाचे पुजारी/पेरमा – मलाय्या सकाटी, राजु आत्राम, गंगाराम मडावी, सिताराम गावडे, मुकेश आत्राम सह आदिवासी समाजाचे समाज बांधव उपस्थित होते.






























