खरेदी केंद्र तत्काळ सुरु करण्याची शेतक-यांची मागणी -खरेदी केंद्राअभावी तेलंगणात धान विक्रीची नामूष्की

307

T NEWS मराठी नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
तालुक्यातील शेतक-यांचे धान निघून एक महिन्याचा कालावधी उलटला आहे़ मात्र तालुक्यातील अनेक ठिकाणी अद्याप धान खरेदी केंद्र सुरु झालेले नाही़ परिणामी शेतक-यांना शेजारचे राज्य तेलंगाणात धान विक्रीची नामूष्की ओढावली आहे़ यातून शेतक-यांची आऱ्थिक पिळवणूक होत आहे़ त्यामुळे शासनाने तत्काळ धान खरेदी केंद्र सुरु करुन दिलासा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतक-यांनी तहसिलदारांमार्फत जिल्हाधिका-यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे़
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यासह तालुक्यातील शेतक-यांचे उत्पादित धान्य निघून एक महिन्याचा कालावधी लोटला आहे़ मात्र अद्यापही तालुक्यात अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरु झालेली नाही़ त्यामुळे शेतक-यांचे धान उघड्यावर पडून आहे़ या उघड्यावरील धान्याची सुरक्षा करणे शेतक-यांना कठीण झाले आहे़ तर काही शेतकरी खरेदी केंद्र सुरु न झाल्याने तेलंगणा राज्यात धान विक्री करीत आहेत़ मात्र यामुळे शेतक-यांनास शासनाच्या हमीभावापासून वंचित राहावे लागत आहे़ तर खासगी व्यापा-यांकडून कमी दर आखून शेतक-यांची आऱ्थिक पिळवणूक केली जात आहे़ याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत तात्काळ खरेदी केंद्र सुरु करुन धान्य खरेदीची प्रक्रिया सुरु करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतक-यांनी निवेदनातून केली आहे़
तहसिलदारांना निवेदन सादर करतांना अशोक इंगिली, व्येंकटेश ताल्ला, वेंकन्ना भिमकारी, केशव मस्कुरी, लक्ष्मीस्वामी बोल्ले, तिरुपती गोदारी, राजू कुम्मरी, सदानंदम बागे, बापू भक्तू, राजन्ना मारबाईना, राजन्ना कडकेरी आदी शतकरी उपस्थित होते़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here