कमलापूर परिसराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध; आ.डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न: ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

530
  • T NEWS मराठी नेटवर्क
    कमलापूर (विशेष प्रतिनिधी):
    अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी आज कमलापूर परिसराचा दौरा करून विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन केले. यावेळी आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना, “क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून, नागरिकांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यास मी कटिबद्ध आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले.
    शिक्षण आणि आरोग्यावर विशेष भर-
    सभेत बोलताना आमदार आत्राम म्हणाले की, ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. विशेषतः शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रांच्या सक्षमीकरणावर आपली विशेष नजर असून, या विभागांच्या प्रगतीसाठी आपण वचनबद्ध असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आगामी काळात या परिसरात पायाभूत सुविधांचे जाळे अधिक मजबूत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
    नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत
    आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचे कमलापूर येथे आगमन होताच स्थानिक नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साही घोषणाबाजीने त्यांचे जंगी स्वागत केले. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या या अभूतपूर्व प्रेमाबद्दल आत्राम यांनी कृतज्ञता व्यक्त केली व सर्वांचे आभार मानले.
    या कार्यक्रमाला परिसरातील सरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या विकासकामांच्या भूमिपूजनामुळे कमलापूर परिसराच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कार्यक्रमाचे आयोजना सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम,रवींद्र ओल्लालवार,राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम,कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाझ शेख,अरुण मुक्कावार सरपंचा रजनीता मडावी,माजी सरपंच सांबाया करपेत,माजी पंचायत समिती सदस्य मांतय्या आत्राम,माजी जिल्हा परिषद सभापती इंदरशाह मडावी, प्रतिष्ठित नागरिक,गोकुल भट्ट, सत्यनारायण रेपालवार, मलाय्या सकाटी, माजी सरपंच पोरतेट,पुताला बापू, माणिक मडावी मंड्रा, ग्रामपंचायत वेंकटापूरचे सरपंच अजय आत्राम, ग्रामपंचायत सिरकोंडाचे सरपंच लक्ष्मण गावडेसह परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here