मेधाश्री इंग्रजी माध्यम शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

151

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :

सिरोंचा (प्रतिनिधी ): महान भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमण (CV Raman) यांनी केलेल्या रामन प्रभावाचा शोध साजरा करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या निमित्ताने सिरोंचा तालुक्यातील रामांजपूर येथील मेधाश्री इंग्रजी माध्यम शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्रीनिवस दशरथी होते, प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपध्यक्ष श्रीनिवास चिंतावार,गट- शिक्षणाधिकारी नीलकंंठम दोंतुला,प्राचार्य शहीद शेख हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून पालक उपस्थित होते.
या दिवशी सर सीव्ही रामन यांनी रामन इफेक्टचा शोध जाहीर केला. दरवर्षी हा दिवस वेगळ्या थीमने साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे प्रेरित करणे आणि सर्वसामान्यांना विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीची जाणीव करून देणे असल्याची संस्थेचे सचिव श्रीनिवास दाशरथी यांनी मार्गदर्शन केले.
या दिवशी मेधाश्री इंग्रजी माध्यम शाळेतअनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here