


सिरोंचा(प्रतिनिधी ) तालुक्यातील मोटला टेकडा येथे पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आली.या पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार पेंटाजी तलंडी,अहेरी तालुका काँग्रेस पक्षाचे निरीक्षक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,माजी समाज कल्याण सभापती सगुणाताई तलंडी,अविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेते बानय्याभाऊ जनगाम,आदिवासी सेल गडचिरोली जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,अनुसूचित जाती सेल जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले,महिला काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष नीताताई तलांडी, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी सिंरोचा सतीश जवाजी, उपसरपंच रामचंद्र गोगला,राजेश पडला आदी मान्यवर उपस्थित होते.विविध पक्षातून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व काँग्रेस शुभचिंतकांना काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे दुप्पटा घालून सगळ्यांचा काँग्रेस पक्षात स्वागत केले आहे.


2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मतदान करून भरघोष मताने निवडून देण्याचे उपस्थित काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व नव्याने काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतले.तसेच सिरोंचा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या बळकट करण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत घेऊ असे अविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष व काँग्रेस नेते बानय्या जनगाम पुढे बोलत होते.या पक्ष प्रवेश कार्यक्रमात काँग्रेसचे पदाधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी राज पागे, धनंजय पागे, सुमन गोगुला, समय्या मोरला, नागेश गोगुला, चालपत जाडी, आनंदराव गोगुला, व्यंकटेश गोगुला, सडवली आईला, श्रीधर अंगाला, बापू जाडी, मनोहर गोगुला, नागेश अंबाला, समय्या गोगुला, अंबाला बानय्यासह मोटला टेकडा परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.


























