




गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा(प्रतिनिधी )सिरोंचा पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रामांजापूर येथील इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपाचे छत मागील वर्षी वादळीवाऱ्याने उडून गेले होते. मात्र मागील एक वर्षापासून छत बसविण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आता रखरखत्या उन्हात वाहनधारकांना पेट्रोल भरावे लागत आहे.

सिरोंचा तालुक्यात दोनच पेट्रोल पंप असल्याने ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. वाहनचालक ड्रम आणि कॅनमध्ये पेट्रोल मोठ्या प्रमाणात भरत असतात. दुचाकीस्वारांना भर उन्हात रांगेत उभे रहावे लागत असल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सिरोंचा येथे तापमान नेहमीच ४३ अंशाच्या आसपास असते. अशा उघड्यावर पेट्रोल भरताना काही अनुसूचित घटना घडू शकतात.
मागील एक वर्षापासून छत नसल्याने ग्राहकांना पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे. राजीव नगर येथील पेट्रोल पंपावर नेहमी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असते. यामुळे रमांजापूर येथील पेट्रोल पंपावर गर्दी असते. मात्र छत नसल्याने वाहनचालकांची होरपळ होत आहे.
या बाबीची कंपनीने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.





























