नेटवर्क हवंय चढा पहाडीवर… -झिंगानूर परिसरात मोबाईल टॉवर बनले शोभेची वास्तू

251

 

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा (प्रतिनिधी )
जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात अद्यापही मुलभूत सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात जग 5 जीकडे वळला असताना मात्र झिंगानूर परिसरात एकमेकांना संपर्क साधण्यासाठी चक्क पहाडीवर चढावे लागत आहे. शासन, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या भागात नेटवर्कची समस्या फार गंभीर बनली आहे.
झिंगानूर परिसरात स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही मुलभूत सोयीसुविधा पोहोचलेल्या नाहीत. या परिसरात जवळपास 15 गावांचा समावेश होतो. या गावातील नागरिकांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी चक्क पहाडीवर चढावे लागत आहे. येथे बीएसएनएल टॉवर असूनही ते शोभेची वास्तू बनले आहे. विशेष म्हणजे, पहाडीवर चढल्यानंतर त्याठिकाणी तेलंगाणा व छत्तीसगड राज्यातील मोबाईल नेटवर्क मिळते. या भागातील समस्या अत्यंत गंभीर असूनही स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

पहाडीवरही एकाच ठिकाणी मिळते नेटवर्क –
झिंगानूर येथील शिक्षण घेणारे मुले व मुली नेटवर्क नसल्याने जंगल मार्गावरील एक पाहाडीवर चढतात. याठिकाणी छत्तीसगड, तेलंगाणा राज्यातील जीओचे नेटवर्क मिळते. त्याठिकाणी पूर्ण गावातील लोक आणि कर्मचारी जाऊन फोन करतात. झिंगानूर आदिवासी क्षेत्र असल्याने शासनाचे या क्षेत्राकडे नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संपर्क साधण्यास कोणत्याही प्रकारचे नेटवर्क नाही. शेवटी जंगलात जाऊन पाहाडीवर दुस-या राज्याच्या नेटवर्कवर फोन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, पहाडीवर आदिवासी बांधवांचे देवास्थान आहे. याच जागेवर नेटवर्क मिळते. इतर कोणत्याही ठिकाणी नेटवर्क मिळत नाही. जिल्हाधिकारी, आमदार, खासदार यांनी या समस्येकडे लक्ष देवून झिंगानूर येथे जीओ कंपनीचे टॉवर बसविण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here