जिल्ह्याचा 94.42 टक्के निकाल -मुली ठरल्या जिल्ह्यात अव्वल

236

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
गडचिरोली(प्रतिनिधी )
उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी, (21 मे) रोजी दुपारच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. राज्यातील दुर्गम, मागास म्हणून गणल्या जाणा-या गडचिरोली जिल्ह्याने 94.42 टक्के निकाल देत यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. सर्वाधिक 92.67 टक्के गुण घेत देसाईगंज येथील कुथे पाटील विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी रुची किशोर शास्त्रकार अव्वल आली आहे. तर गडचिरोली येथील शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची माही हंसराज उराडे (92.50) व आरमोरी येथील महात्मा गांधी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा संचित संजय उरकुडे (92.33) अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले आहेत. विशेष जिल्ह्यात मुलांच्या (92.94 टक्के) तुलनेत यंदाही मुलींनी (95.94 टक्के) असा निकाल देत आम्हीच हुशार असल्याचे सिद्ध केले आहे.
यंदा बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण 12 हजार 353 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात प्रत्यक्षात 11 हजार 664 विद्यार्थी यात 6268 मुले तर 6085 मुलींनी परीक्षा दिली. यातील 11 हजार 664 परीक्षार्थी उत्तीण झाले. यात (मुले 5826, मुली 5838) समावेश आहे. गडचिरोली विज्ञान शाखेत सरसी केल्याचे निदर्शनास येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत (92.72 टक्के) यंदा टक्केवारीत जराशी वाढ (2 टक्के) झाल्याचे निदर्शनास येत आहे. असे असले तरी गुणवत्तेचा टक्का घसरल्याने शैक्षणिक वर्तुळात काळजी व्यक्त होत आहे. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाने आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

1

100 टक्के निकाल देणा-या शाळा –
शिवाजी विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली, प्रियंका कनिष्ठ महाविद्यालय, कनेरी, सैनूजी पाटील कोवासे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मुरखळा, विद्याभारती ज्युनिअर कॉलेज, आंबेशिवणी, गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली, स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, गडचिरोली, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली, धर्मराव ज्युनिअर कॉलेज, आलापल्ली, शासकीय आश्रमशाळा, जिमलगट्टा, शंकरराव बेझलवार ज्युनिअर कॉलेज, अहेरी, किसान ज्युनिअर कॉलेज, वडधा, कर्मवीर ज्युनिअर कॉलेज, वासाळा, आकाश कनिष्ठ महाविद्यालय, मोहझरी, यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय, विहिरगाव, शासकीय आश्रमशाळा, कुरंडीमाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, आरमोरी, श्री सद्गुरु साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय, आष्टी, राजर्षी शाहू महाराज स्कूल ऑफ स्कॉलर्स, चामोर्शी, जि. प. ज्युनिअर कॉलेज, चामोर्शी, महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, देसाईगंज, विनायक ज्युनिअर कॉलेज, विसोरा, तिरुपती ज्युनिअर कॉलेज, कोकडी, मोहसीनभाई जव्हेरी कनिष्ठ महाविद्यालय, देसाईगंज, यशोदादेवी इंग्लिश मीडियम स्कूल, देसाईंगंज, शासकीय आश्रमशाळा, कारवाफा, शासकीय आश्रमशाळा, पेंढरी, राजीव गांधी महाविद्यालय, कारवाफा, जि. प. ज्युनिअर कॉलेज, एटापल्ली, छत्रपती ज्युनिअर कॉलेज, मसेली, वनश्री महाविद्यालय, कोरची, शासकीय आश्रमशाळा, येंगलखेडा, विद्याभारती ज्युनिअर कॉलेज, कुरखेडा, संस्कार पब्लिक स्कूल, कुरखेडा, नेताजी कनिष्ठ महाविद्यालय, अडपल्ली माल,शासकीय आश्रमशाळा, बामणी, संत मानवदयाल महाविद्यालय, रंगय्यापल्ली डिज्निलॅंड इंग्लिश मीडियम स्कूल, सिरोंचा, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, सिरोंचा आदी शाळाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here