


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
गडचिरोली(प्रतिनिधी )
13 वने 7 टक्के वनमहसुल अनुदान योजना सन 2024-25 या वर्षाकरीता खरीप भात लागवड 50 टक्के अनुदानावर गडचिरोली पंचायत समितीचय वतीने खरीप भात लागवडीसाठी बियाण्यांच्या वितरणास सुरुवात करण्यात आली.
पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात अतिरीक्त मुख्य कार्यपालन अधिकारी भूयार, कृषी विकास अधिकारी प्रदीप तुमसरे, गट विकास अधिकारी सुरेंद्र गोंगले यांचे हस्ते तालुक्यातील शेतक-यांना 50 टक्के अनुदानावरील बियाण्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कृषी अधिकारी प्रल्हाद पदा, एस. आर. कानेकर, विस्तार अधिकारी डी. जे. ठाकरे तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. खरीप हंगामासाठी तालुक्यातील शेतक-यांना 50 टक्के अनुदानावर 20 क्वि. एमटीयु 1010, पिडीकेव्ही तिलक 20 क्वि., सुवर्णा 20 क्वि. भात बियाणे उपलब्ध झाले आहे. शेतक-यानी वेळीच बियाण्याची उचल करावी व उत्तम दर्जाची बियाण्याची लागवड करावी, असे आवाहन अतिरीक्त मुख्य कार्यपालन अधिकारी भुयार यांनी केले आहे.






























