प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या – दवंडी हत्याकांडाला धक्कादायक कलाटणी; पत्नीसह तिघे ताब्यात

123

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
कोरची (प्रतिनिधी)
कोरची तालुक्यातील दंवडी गावातील एका किराणा दुकानदाराची गळा चिरुन निर्घृण हत्या केल्याची घटना 11 ऑक्टोबरच्या रात्री घडली होती. या खुनाचा उलगडा करण्यात बेडगाव पोलिसांना यश आले असून अनैतिक संबंधात अडथळा ठरणा-या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. हत्येप्रकरणी 13 ऑक्टोबरच्या रात्री पोलिसांनी पत्नी, प्रियकर तसेच अन्य एक असे तिघांना अटक केली आहे.
11 ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात इसमांनी दवंडी येथील येथील लखन सुन्हेर सोनार (38) याची गळा चिरुन हत्या केल्याचे उघडकीस आले होते. पाच ते सहाच्या संख्येत असलेल्या तोंडाला काळे कपडे बांधून आलेल्या अज्ञात मारेक-यांनी घरात प्रवेश करीत लखन यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने खुन करीत पोबारा केल्याची फिर्याद पत्नी सरिता हेने बेडगाव पोलिस मदत केंद्रात दिली. याअंतर्गत अज्ञात इसमांविरोधात कोरची पोलिस ठाण्यात खुना गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत कोरची पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक फडतरे व पोमकें बेडगावचे प्रभारी पोउपनि विठ्ठल सुर्यवंशी यांनी सखोल चौकशी केली असता, मयताची पत्नीचे गावातीलच सुभाष हरिराम नंदेश्वर या इसमासोबत अनैतिक संबंध असल्याचे माहिती पुढे आले. याच कारणावरुन लखन व पत्नी सरितामध्ये नेहमीच वाद होत होते. या माहितीच्या आधारे मृतकाच्या पत्नीची अधिक विचारपूस केली असता तिने प्रियकर व त्याच्या साथीदाराच्या मदतीने खुन केल्याचे कबूल केले. हत्ये प्रकरणी पत्नी सरिता लखन सोनार, प्रियकर सुभाष हरिराम नंदेश्वर दोघेही रा. दवंडी व बळीराम गावडे रा. कुकडेल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here