नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या पुढाकाराने सिरोंचा शहरात बतकम्मा देवी मुर्तीचे भूमिपूजन -नपं मुख्याधिकारी जनक काडबाजीवार यांच्या हस्ते पूजाअर्चना; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

403

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी )सिरोंचा नगर पंचायतच्या पुढाकाराने बतकम्मा देवी मूर्तीचे भूमिपूजन प्राणहिता नदी काठावरील विठ्ठलेश्वर मंदिर प्रांगणात पार पडले. नपं मुख्याधिकारी जनक काडबाजीवार यांच्या हस्ते विधीवत पुजाअर्चना करुन भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे, एक वर्षापूर्वी नपं उपाध्यक्ष भाविकांनी सदर मंदिर परिसरात बतकम्मा देवी मुर्ती उभारण्याचे आश्वासन दिले होते. वर्षभरातच त्यांनी भाविकांची वचनपूर्ती केल्याने भाविकांमध्ये आंनदाचे वातावरण आहे.


तेलंगणा राज्यात मोठ्या भक्तीभावाने साजरा होणारी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बतकम्मा देवीला समर्पित या मूर्तीची उभारणी होत असल्यामुळे भक्तगणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी नवरात्री दरम्यान या देवीच्या उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते. या उत्सवात मोठ्या संख्येने भक्तगण भाग घेत असतात. यात महिलाभा भाविकांची उपस्थिती लक्षणीय असते. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सदर मंदिर परिसरात बतकम्मा मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्याचे आश्वासन नपं उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी मागील वर्षी केली होती. वर्षभरातच बतकम्मा मुर्तीची स्थापना होणार असल्याने पाशा यांनी भाविकांना दिलेल्या शब्दाची पूर्तता केल्याने भाविकांनी त्यांचे विशेष आभार मानले आहे. बतकम्मा मूर्तीच्या निमित्ताने सिरोंचा शहराची शोभा आणखी वाढणार आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगर उपाध्यक्ष नगर पंचायत सिरोंचा बबलू पाशा, मुख्याधिकारी जनक काडबाजीवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष सतीश जवाजी, सभापती इम्तियाज खान, नगरसेवक राजेश बंदेला,पुरोहित रमण सर, मारुती गणपूरपू, ज्येष्ठ नागरिक के. ब्रह्मानंद, शंकर बुधावार, सुभाष व्यास, दामोदर मार्गोणी, नागेश दुग्यला, शंकर मारगोनी, येल्पूला वेंकटेश, पानेम राजू, सतीश येगोलपु आदींसह नगर पंचायतीचे कर्मचारी व बहूसंख्य नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here