रस्त्याचे खडीकरण न करताच टाकली गिट्टी -कोटापल्ली रस्ता कामावरील प्रकार; कंत्राटदाराची मनमानी

295

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी )
तालुक्यातील कोटापल्लीवरुन रेगुंठाकउे जाणा-या मुख्य मार्गावर कोटापल्ली गावाबाहेर असलेल्या मधुओरिए या नाल्यापासून तर टी-पॉईंटपर्यंत 1 किमी रस्त्याचे डांबरीकरण सुरु आहे. मात्र सदर मार्गाचे खडीकरण तसेच मजबूतीकरण न करताच थेट गिट्टी टाकून डांबरीकरण करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार संबंधित कंत्राटदाराकडून सुरु आहे. सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
रस्त्याचे डांबरीकरण करण्यापूर्वी संबंधित रस्त्याचे मजबुतीकरण करणे गरजेचे आहे. त्यानंतरच डांबरीकरण करावे, लागते. परंतु कोटापल्ली गावाच्या बाहेर रस्त्याचे डांगरीकरण करतांना मजबुतीकरणाला बगल देत थेट डांबरीकरणास सुरुवात केली जात आहे. सदर काम नियमाला धरुन नाही. जुन्याच रस्त्यावर गिट्टी टाकून डांबरीकरण करण्याचा प्रयत्न कंत्राटदाराद्वारे सुरु आहे. सदर काम थातूरमातूर केल्या जात असल्याने ग्रामस्थांनी आक्षेप घेत सदर काम बंद पाडले होते. मात्र पुन्हा कंत्राटदाराने कामास सुरुवात केली आहे. निकृष्ट कामामुळे अल्पावधीत या रस्त्याची वाट लागण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे. त्यामुळे या रस्ता कामाची वरिष्ठांनी पाहणी करुन कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कोटापल्ली येथील रस्ता बांधकामात कंत्राटदाराचा मनमर्जी सुरु आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. सार्वजनीक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देत कामाची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करावी.
संजीव आत्राम, ग्रा. पं. सदस्य कोटापल्ली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here