


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी) शहरातील पोचम्मा मंदिर परिसरात 30 लाख रुपयांच्या निधीतून सीसी रोड आणि पार्किंग टाईल्स कामाचे उद्घाटन नगर पंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या हस्ते पार पडले. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिक व भाविकांना दैनंदिन वाहतुकीस अधिक सुविधा मिळणार असून, मंदिर परिसर अधिक सुटसुटीत आणि आकर्षक होणार आहे.
पोचम्मा मंदिर परिसर हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असून, येथे दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. त्यामुळे परिसरात वाहतूक व वाहनतळ व्यवस्थेत अडचणी निर्माण होत होत्या. त्या पार्श्वभूमीवर रस्त्याचे मजबुतीकरण व पार्किंगसाठी टाईल्स बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाकरीता निधीची कमतरता भासत होती परंतु नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी शासनाकडे विशेष पाठपुरावा करून निधी खेचून आणला. या कामामुळे मंदिर परिसराची एकूण व्यवस्था सुधारली जाईल. गर्दीच्या काळात भाविकांना वाहने लावण्यासाठी अधिक जागा उपलब्ध होईल आणि वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही. परिसरातील नागरिकांनाही या रस्त्याचा मोठा लाभ मिळणार आहे.
सदर विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटन प्रसंगी नगरसेवक नरेश अलोने,नगरसेविका महेश्वरी पेद्दापल्ली, सीतापती गट्टू, ब्रह्मानंद कोट्टागट्टू, काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, स्वीकृत नगरसेवक राजेश बंदेला, पोचम आकुदरी ,सल्लागार राहुल गरपल्लीवार, प्रणित मार्गोनी, राजू पानेमवार, नागेश दुग्याला, सतीश येगोलापू,नजीम शेख, शारिक शेख, मोगलराज पेद्दापल्ली, मदनय्या मादेशी, निखिल मागीडी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी आणि अनेक युवक सहभागी झाले होते. परिसरातील नागरिकांमध्ये या कामाबाबत समाधानाचे वातावरण आहे. या कामाच्या अंमलबजावणीनंतर मंदिर परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि नियोजित दिसेल. यामुळे धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल. भविष्यात अशा आणखी विकासकामांमुळे परिसराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल. या विकास कामामुळे शहरात सकारात्मक वातावरण तयार झाले असून, भविष्यात अशीच कामे वेगाने राबवली जातील, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.




























