


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी )9 ऑग्स्ट रोजी आयोजित जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधिून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत बुधवार,6 ऑगस्ट रोजी सिरोंचा तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत येत असलेल्या सिरोंचा तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा, सिरोंचा, बामणी, झिंगानुर, ज्ञानदीप शाळा सिरोंचा, अनु. आश्रम शाळा असरअल्ली या शाळांमध्ये जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व निरीक्षक म्हणून कस्तुरे यांनी जबाबदारी पार पाडली. प्रमुख अतिथी म्हणून अरवेली, दुर्गम, कांबळे, फुलेकर, मडावी, गेडाम, शेख, येलेकर, सिंधबंदगे, पूजलवार, बिरादार आदी उपस्थित होते. शाळेच्या वतीने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांनी कलागुणांची उधळण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गडपुरपवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.






























