पेरमिली ते पल्ले रस्त्याचा बांधकामाची केली पाहणी

355

T NEWS मराठी नेटवर्क-
अहेरी(प्रतिनिधी) तालुक्यातील मौजा पेरमिली ते पल्ले गावाला जोडणारा रस्ता बांधकामाची पाहणी हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच – बालाजी गावडे यांनी पाहणी केली.
सदर रस्ता मंजुर करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब यांनी शासन स्तरावर सतत पाठपुरवठा करून सन २०२४ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्ता मंजुर केलेले आहे.
म्हणुन संबंधित बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदार यांनी सन २०२४ मध्ये सदर रस्त्यातील प्रथम लहान मोठे पुल बांधकाम केले आणि आता त्या रस्त्यावर GSB मुरुम टाकने सुरू आहे. यानंतर सदर रस्त्याला पक्का डांबरीकरण करण्यात येणार आहे.
यावेळी रस्ता पाहणी करतांना रस्त्यावर टाकणारा GSB मुरुम हे कमी प्रमाणात टाकत असल्याची दिसुन आले. त्यामुळे त्याबाबतची माहिती संबंधित इंजिनिअर यांना देण्यात आला. तसेच रस्ता पाहणी दरम्यान संबंधित कंत्राटदाराचे दिवाणजी सह रस्त्यावर काम करणारे मजुर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here