सर्पदंशाने शेतक-याचा मृत्यू

236

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
चामोर्शी (प्रतिनिधी )
तालुक्यातील माडे आमगाव येथे तेंदूपाने गोळाकरताना सर्पदंश होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना 19 मे रोजी सकाळी 9 वाजता घडली. रैनू लालू मट्टामी (51) रा. माडे आमगाव असे मयताचे नाव आहे. सकाळीच तेंदुपत्ता संकलनासाठी माडेआमगांव जंगल परिसरात गेले होते. ता तेंदूपत्ता संकलन करताना विषारी सापाने दंश केला. त्यांना चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात भरती केले. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here