खासदारांनी जाणल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समस्या -अतिदुर्गम झिंगानूर प्राआ केंद्राला भेट

129

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
सिरोंचा (प्रतिनिधी )
खासदार डॉ. नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी नुकतीच सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून तेथील समस्या जाणून घेतल्या.
यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहाणी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. मारगोनीवार यांच्याकडून केंद्रातील औषधी तुटवडा, रुग्णवाहिका, कर्मचारी संख्या, उपलब्धता आदी समस्या जाणून घेतल्या. तसेच विविध विषयावर चर्चा केली. याप्रसंगी माजी आमदार पेन्टारामा तलांडी, जिपचे माजी अध्यक्ष अजय कंकडलावार, कॉंग्रेसचे आदिवासी जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी, झिंगानूरच्या सरपंच निलीमा मडावी, उपसरपंच शेखर गणरापुवार, माजी सरपंच कारेजी मडावी, समाजसेवक तथा माजी ग्रापं सदस्य रामचंद्र कुमरी, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश जावाजी, आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेस नेता बानय्या जनगाम,प्रतिष्ठित नागरिक सिरीया मडावी, कारे मडावी, कैलास मडावी, रामा मडावी, माजी उपसरपंच भारत मडावी, बोड्डा आत्राम, रमेश गावडे, पेंटा कुडमेथे, दासू मडावी, राकेश गावडे, लक्ष्मण मडावी, पोरीया मडावी, उपसरपंच पाकिरा मडावी, पेंटा सिडाम, पोचम मडावी, गणेश मडावी, शंकर गावडे, लक्ष्मण गावडे, मुल्ला कुडमेथे, मुल्ला आत्राम, संतोष गावडे, मासा सिडाम, कन्नय्या मडावी, नीलेश मडावी, नीलेश गावडे उपस्थित होते.

नागरिकांनी दिले मागण्यांचे निवेदन –
यावेळी झिंगानूर येथील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र कुमरी व नागरिकांनी खासदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तसेच या परिसरातील समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी निवेदनातून केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here