


T NEWS मराठी नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी )मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे़ या पुराचे पाणी सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शिरले आहे. यामुळे अनेक गावे जलमय झाली असून शेतपिक पाण्याखाली गेल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे़ त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी 
कोल्लूरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तेलंगणा राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे श्रीरामसागर जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे़ यामुळे गोदावरील नदीला पुर आला आहे़ याचा फटका नदी काठावरील सिरोंचा तालुक्याला बसला आहे़ या पुराचे पाणी तालुक्यातील मुक्कीडीगुत्ता, सोमणूर नवीन, सोमणूर जुना, आशिल्लो, अंकिशा, नारायणपूर, गार्कपेटा, व्यंकटपूर, ग्लासपेट्ट, टेकडातला आदी गावांना बसला आहे़ या गावांतील शेतांमध्ये पाणी शिरल्यामुळे मिरची आणि कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेकांचे उपजीविकेचे साधन उद्ध्वस्त झाले आहे.
शासन, प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेत तत्काळ नुकसानग्रस्त भागात पंचनामे करुन शेतक-यांना नुकसान भरपाई देत नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष(अजित पवार)गटचे मधूकर कोल्लूरी यांनी केली आहे़.



























