


T NEWS मराठी नेटवर्क-
एटापल्ली (प्रतिनिधी)टाकुक्यातील
ग्रामपंचायत जवेली (खुर्द) येथील ग्रामस्थांनी ग्रामसेविका कु. एल. डब्ल्यू. मडावी यांच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी, पं.स. एटापल्ली यांना निवेदन देत तात्काळ बदलीची मागणी केली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, संबंधित ग्रामसेविका ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यास नसून गडचिरोली वरून ये-जा करतात. त्या आठवड्यात फक्त एकदाच कार्यालयात हजर राहतात. यामुळे नागरिकांच्या आवश्यक कामांमध्ये मोठा अडथळा निर्माण होत असून जन्म/मृत्यू दाखले, रहिवासी प्रमाणपत्र, इतर महत्वाची कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत.
यासोबतच,

मासिक सभा घेतली जात नाही,सरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी निर्णय घेतले जातात,
ग्रामपंचायतीचे विविध विकासकामे प्रलंबित राहिली आहेत
असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावातील परिस्थिती बिकट झाल्यामुळे ग्रामस्थ, *सरपंच मुन्ना पुंगाटी, तसेच तोंदे कतावो, सैनु लेकामी, आशिष पुंगटी, देवाजी मटामी, श्रीनिवास मटामी, नामदेव लेकामी, गजू मठामी, अजय नरोटे,तसेच माजी जि.प. सदस्य संजू चारडुके आदींनी एकजुटीने तक्रार नोंदवली.
ग्रामसेविकेची तात्काळ बदली न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करण्यास बाध्य होऊ,असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनात दिला आहे.
जवेली (खुर्द) ग्रामस्थांच्या या सामूहिक भूमिकेमुळे या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून त्यावर पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


























