बळीराजा योजनेतून ग्रामीण भागातील रस्ते विकासाला गती -आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन

135

सिरोंचा (प्रतिनिधी )
मुख्यमंत्री बळीराजा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते विकासाला गती दिली जात आहे. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचणे सुलभ होणार असून शेतीमालाच्या वाहतुकीस चालना मिळून आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आ़ धर्मरावबाबा आत्राम यांनी केले़
तालुक्यातील नगरम येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत/पांदण रस्ते योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण पांदण रस्त्याच्या कामाचा भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते़ ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मागणीची दखल घेत या कामास मंजुरी देण्यात आली असून, संबंधित यंत्रणेला काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या़ हा रस्ता लवकरच पूर्णत्वास येऊन नागरिकांच्या सेवेत दाखल केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. शेतबांधापर्यंत पोहचण्यासाठी पांदण रस्त्याची उभारणी करावी, अशी मागणी शेतक-यांकडून सातत्याने होत होती़ या दीर्घकालीन मागणीची दखल माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आ़ धर्मरावबाबा आत्राम यांनी घेत मुख्यमंत्री बळीराजा शेत/बांधण रस्ते योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला़ या पांदण रस्ता बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आला़ सदर रस्ता बदी समय्या यांच्या घरापासून ते नदीच्या टोकापर्यंत बांधण्यात येणार असून, यामुळे परिसरातील पांदण रस्ता कामाला प्रारंभ झाल्याने नगरम भागातील बळीराजाच्या विकासाला गती मिळण्यासह नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे़ विशेषतः पावसाळ्यात शेतांपर्यंत पोहोचण्यासाठी होणाऱ्या अडचणी दूर होऊन वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
राकॉ गडचिरोली जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,राकाँ तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम, नगरसेवक सतीश भोगे, सतीश राचारलावार, व्यापारी सेल अध्यक्ष ओमप्रकाश ताटीकोंडावार, जिल्हा महिला उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी आरवेल्ली, पत्रकर नगाभूषणम चकिनारापूवार,रमेश तोटा, सरपंच लक्ष्मण गावडे, सत्यनारायण चिलकामारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here