अतिक्रमणधारकांना जागा देण्यासाठी प्रस्ताव तयार करा -आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या निर्देश -सिरोंचा परिसर विकासासाठी ९० कोटीचा निधी मंजूर

153

T NEWS मराठी नेटवर्क –
सिरोंचा (प्रतिनिधी )
सिरोंचा शहरासह परिसरातीच्या विकासाला दिशा देण्यासाठी शासन स्तरावरुन ९० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या निधीतून नगर व ग्रामीण भागात मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यात येणार असून या विकास कामांमुळे ग्रामीण भागालाही बळकटी देण्यात येणार आहे़
शासन स्तरावरुन प्राप्त निधीचा योग्य विनियोग करण्यासंदर्भात नुकताच आ़ धर्मरावबाब आत्राम यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली़ या आढावा बैठकीत त्यांनी अतिक्रमण धारकांसाठी १५०० चौ़ फुट जागा प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली़ शासनाद्वारे मातोश्री पांदन रस्ते योजनेअंतर्गत २५ कोटी रुपयांची मजूरी देण्यात आली असून या निधीअंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते, संपर्क सुधारण्यावर भर देण्यात येत आहे़ नगरपंचायत क्षेत्रासाठी अमृत पाणी पुरवठा योजनेसाठी ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून नागरिकांना फिल्टरयुक्त शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे़ याशिवाय जिल्हा विकास योजनेतून सुमारे २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे़ याअंतर्गत काही कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत़ आढावा बैठकीत अतिक्रमण धारकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला़ आ़ धर्मरावबाबा आत्राम यांनी पात्र अतिक्रमण धारकांना १५०० चौ़ फुट जागा देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले़ तसेच कायम पट्टे देण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना केल्या़ या विकास निधीमुळे सिरोंचा परिसरात विकास कामांना गती येणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here