अखेर आविसं व काँग्रेस पक्षाने सोडवल्या मोटला टेकडा गावातील शेतकऱ्यांच्या समस्या… – आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष व काँग्रेस नेता बानय्या जनगाम यांच्या प्रयत्नला यश.

300

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
सिरोंचा (प्रतिनिधी )कांग्रेस पक्षाचे नेते अविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम तसेच कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सतीश जवाजी यांच्या पुढाकाराने टेकडा मोटला गावातील शेतकऱ्यांसाठी शेतात जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नाल्याचे बांधकाम श्रमदानाने करण्यात आले.
टेकडा मोटला येथील शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्त्यावर असलेल्या नाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत होता या नाल्यात 12 महिने पाणी वाहत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी खूप अडचण होत होता. ही बाब शेतकऱ्यांनी कांग्रेस नेते बानय्या जनगाम व काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवाजी यांना कळवताच तात्काळ त्यांनी मोक्यावर जाऊन भेट दिली व नाल्याचे बांधकाम स्वतः करायचे ठरवले.आणि सिरोंचा येथील तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून मुरूमची परवानगी काढून त्या मुरूमसाठी बानय्या जनगाम यांनी आर्थिक मदत केली.मोटला टेकडा गावातील शेकडो काँग्रेस कार्यकर्ते व गावकऱ्यांनी मिळून श्रमदानाने या नाल्याचे बांधकाम पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी रस्ता झाला असून मोटला टेकडा परिसरातील सरकार कडून कसलीही मदत नसताना सुद्धा गावाकऱ्यांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रमदानद्वारे स्वतः हे कार्य पूर्ण केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळीआविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, कॉग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जवाजी,ग्रामपंचायत उपसरपंच रामचंद्रम गोगुला, नागेश बुर्री, सराय्या गुंटा, वैकुंटम डुबुल्ला, श्रीकांत बोरे, रंजित चौदरीसह मोटला टेकडा गावातील आविसं व कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here