उमानूर येथे व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे सुरुवात -माजी जिप.अध्यक्ष तथा कृबास सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन

100

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
सिरोंचा(प्रतिनिधी) अहेरी तालुक्यातील उमानुर येथे जय पेरसापेन क्रिडा मंडळ उमानूरच्या वतीने भव्य व्हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन केली आहे.
व्हॉलीबाल सामन्याचे उद्धघाटन आविसं,काँग्रेस नेते व अहेरी विधानसभा प्रभारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.या कार्यक्रमाचे सहउद्घाटक म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी होते.अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी पंचायत समिती सभापती सुरेखाताई आलाम होते.प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी तालुका काँग्रेस अध्यक्षा डॉ.निसार ( पप्पू )हकीम – जेष्ठ नेते नामदेव आत्राम होते.
ग्रामीण भागामध्ये क्रीडा स्पर्धा आयोजन केल्याने ग्रामीण भागातून उत्कृष्ट खेळाळु तयार होतात. तसेच क्रीडामुळे युवक तंदुरुस्त बनतात असे माजी जिप. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार पुढे बोलत होते. या क्रीडा स्पर्धामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाली आहे.
यावेळी इंदारामचे माजी सरपंच गुलाबराव सोयाम,ॲड. हनमंतू अकुदरी,देवलमरी ग्रामपंचायतचे उपसरपंच हरीश गावडे,राजाराम ग्रामपंचायत सदस्य रमेश पोरतेट,सामजिक कार्यकर्ते नरेंद्र गर्गम,सामजिक कार्यकर्ते नामदेव पेंदाम,उमानुर माजी सरपंच तारक्का आसाम,गोविंदगावचे सरपंच शंकरीताई पोरतेट,जिमलगट्टा ग्रामपंचायतचे सदस्य वनिताताई वेलादी,आविसं काँग्रेस कार्यकर्ते लक्ष्मीनारायण अट्टेला,शामराव गावडे, चिरंजीव गांधरला, विघ्नेश यादावर,राजू बोरकुट,किशोर सडमेक,जेष्ठ कार्यकर्ते जयराम दादा,सोमेश्वर गेडाम,पोचम संपत,सुधाकर पोरतेट,श्रीनिवास मडावी,रमेश जंगम,विलास सलफला,नारायण गांधारला,शंकर गावडे,अनिल आलामसह परिसरातील आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here