सुरजागड प्रकल्पस्थळी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

97

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
एटापल्ली(प्रतिनिधी) तालुक्यातील सुरजागड येथे उभारण्यात आलेल्या लोह प्रकल्पामुळे हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त झाली असून यामुळे या परिसरातील नागरिकांची आर्थिक उन्नती साधली जात आहे. दरम्यान देशभरात 78 स्वातंत्र्योत्सव उत्साहात साजरा होत असतांना सुरजागड आयर माईन्स प्रकल्पात लॉयड्स मेटल्स कंपनीद्वारे स्वातंत्र्य दिनी प्रकल्पस्थळी ध्वजारोहण करीत स्वातंत्र्योत्सव साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन प्रकल्पस्थळी करण्यात आले होते. याप्रसंगी लॉयड्स मेटल्स आणि त्रिवेणी अर्थमूवर्स प्रा. लि. चे कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात के. सथी राव यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आली. याप्रसंगी कार्यकारी संचालक आर. आर. साठपथी, युनिट हेड सुभासिस बोस (माईनिंग उपाध्यक्ष), एल साईकुमार (एव्हीपी-कॉर्पोरेट अफेअर्स), अरुण रावत, संजय चांगलानी यांची प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी प्रकल्पातील कर्मचा-यांना संबांधित करीत समायोजित मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्योत्सवादरम्यान कर्मचा-यांनी देशभक्तीपर गितांवर नृत्य सादर केले. विजेच्या पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच विभागीय स्तरावर ‘बेस्ट एम्प्लॉयी ऑफ द इयर’ म्हणून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या समर्पण, शिस्त आणि उपस्थितीबद्दल सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थांसह परिसरातील प्रतिष्ठीत नागरीक व उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here