



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा – (तालुका प्रतिनिधी)
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्य विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन राधास्वामी मेडिकल सिरोंचा, रक्तवीर सामाजिक संघटना, शिवजन्मोत्सव, परिनिधी कॅटर्स,राजे धर्मराव महाविद्यालय 1998-99 तुकडीच्या माध्यमाने सिरोंचा येथे 15 ऑगस्टच्या निमित्ताने सिरोंचा येथील जिल्हा परिषद शाळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

या रक्तदान शिबिराचे उदघाटन प्राचार्य एन. आर.मरस्कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.सदर रक्तदान शिबिराला उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांनी भेट देऊन रक्तदान केलेल्या युवकांना ओआरएस पॅकेट,फळ व बिस्कीट दिले. या रक्तदान शिबिरात सिरोंचा शहरसह तालुक्यातील युवक व युवतीनी मोठ्या संख्याने सहभागी होऊन जवळपास 90 ते 100 युवक व युवतीनी रक्तादन केले असून रक्तदान शिबिरात भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व रक्तदात्यांचे आयोजकाकडून आभार व्यक्त करण्यात आली.
रक्तदान शिबिरासाठी रक्त संकलन केंद्र गडचिरोलीचे अधिकारी,कर्मचारी रक्त संकलन केले असून सदर रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी धर्मराव विद्यालयाचे सन 1998-99च्या सर्व माजी विध्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.




























