


“A cow was killed in a tiger attack”

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
मुलचेरा(प्रतिनिधी) तालुक्याअंतर्गत येत असलेल्या अंबेला-घोट जंगल परिसरात मागील काही दिवसांपासून वाघाचा मुक्त संचार सुरु आहे. शुक्रवारी अंबेला येथील खंड क्रमांक 578 मध्ये वाघाने एका बैलाला ठार केले होते.
“A tiger killed a bull “ तर आज, सोमवारी, (दि.9) याच जंगल परिसरात चराईसाठी गेलेल्या गायीवर वाघाने हल्ला चढवित ठार केल्याची घटना घडली आहे. वाघाच्या वाढत्या हल्ल्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण आह.
मुलचेरा तालुक्यातील अंबेला येथील कैलास बावणे व अनिल चौधरी या दोघांनी आपल्या गावातील जनावरे चराईसाठी जंगलात नेले होते. वनविकास महामंडळाच्या खंड क्रमांक 19 मध्ये जनावरे चराई करीत असतांना दुपारी (3 PM) 3 वाजताच्या सुमारास वाघाने एका गायीवर हल्ला चढवित तिला ठार केले. वाघाला डोळ्यासमोर बघताच बोबडी वळलेल्या कैलास व अनिलने गावाकडे धाव घेतली. सदर गाय अनिल चौधरी नामक पशुपालकाची असल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून मुलचेरा तालुक्यातील अंबेला-घोट मार्गावरील जंगल परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरु आहे. शनिवारी अंबेला गावातील एक बैल वाघाने ठार केले होते. तर आज, सोमवारी याच वाघाने गायीला ठार केले. मागील काही दिवसात सदर वाघाने याच वनक्षेत्रात जवळपास चार ते पाच जनावरांचा फडशा पाडला आहे. वाघाच्या या हिंस्र हल्ल्यामुळे जंगल परिसरातील शेतक-यांसह नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






























