



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
एटापल्ली (प्रतिनिधी )मौजा हेडरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल दवाखाना चालू झाल्यापासून आत्ता पर्यंत १०० महिलांच्या डिलिव्हरी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यात. त्या निमित्याने आज १०० व्या जन्मलेल्या कन्येचे लॉयड्स काली अम्माल मेमोरियल दवाखाना हेडरीच्या वतीने प्रभाकरण MD lloyds च्या हस्ते चांदीची नानी देवून व बेबी किट देऊन स्वागत करण्यात आले.सोबतच दवाखान्यातमध्ये डिलिव्हरी झालेल्या सर्व महिलांना बेबी किड्स देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी दवाखान्यात शंभर डिलिव्हरी करिता योगदान दिलेल्या, डॉ.प्रिती बुरीवार,डॉ.स्वाती रेड्डी, डॉ.उमेश उत्तरवार, डॉ.चेतन बुरीवार यांचे शाल व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. सोबतच तीनही ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंचव उपस्थित गाव पाटील यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी अरुणाताई सडमेक सरपंच ग्रा.पं. पुरसलगोंदी, नेवलुजी पाटील गावडे सरपंच ग्रा.पं.नागुलवाडी,राजुभाऊ तिम्मा उपसरपंच ग्रा.पं. नागुलवाडी,प्रशांतजी आत्राम उपसरपंच ग्रा.पं.तोंडसा,साई कुमार,बलराम सोमनानी,शितल सोमनानी, संजय चांगलानी,सुनील दौंड PSI पोलिस स्टेशन हेडरी, डॉ.गोपाल रॉय, डॉ.चेतन बुरीवार, डॉ.प्रिती बुरीवार, कटिया तेलामी माजी उपसरपंच हेडरी.कल्पना अलाम माजी सरपंच सुरजागड,झुरूमासू गोटा गाव पाटील बोटमेटा, देवाजी पाटील कवडो गाव पाटील हेडरी,केरकेट्टा मॅडम अंगणवाडी सेविका मंगेर, गोसुजी हिचामी गाव पाटील मंगेर,लचुजी पा. हेडो गाव पाटील हालूर,फबीयानुस खलको प्रतिष्ठित नागरिक पाली टोला,साधू गुंडरु गाव पाटील बांडे,मंगू कलमोटी प्रतिष्ठित नागरिक हेडरी, झुरू कवडो नागरिकहेडरी, अशोक हिचामी प्रतिष्ठित नागरिक हेडरी,बाजी गुंडरु प्रतिष्ठित नागरिक बांडे , रामजी गुंडरु प्रतिष्ठित नागरिक बांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. समस्त कार्यक्रमाला ग्रामस्थांची प्रामुख्याने उपस्थिती होती.





























