युरियाच्या तुटवड्यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी हवालदिल -युरिया खत सहज उपलब्ध न होण्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात -युरिया खत तात्काळ उपलब्ध करून देण्याची अविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांचे मागणी

221

T NEWS मराठी नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
सिरोंचा तालुक्यातील बामणी, जाफ्राबाद, रेगुंठा, सिरकोंडा, झिंगानूर, रमेशगूडम, कोरला, आसरअल्ली, अंकिसा, वडधम, आरडा, जानामपल्ली, सिरोंचा, करासपल्ली, अमरावती, रंगय्यापल्ली आदी गावांमध्ये युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या भागात धान, कापूस, मिरची,! मका, सोयाबीनसह इतर पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली असून, सध्या या पिकाला युरियाची अत्यंत गरज आहे. मात्र, युरिया खत सहज उपलब्ध न होण्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ युरिया उपलब्ध करून देण्याची मागणी आदिवासी विध्यार्थी संघटना सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी केले आहे.

एकीकडे अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान आणि दुसरीकडे बाजारात शेतीमालाला योग्य भाव नाही, अशात खताच्या टंचाईने शेतकरी तिहेरी संकटात सापडला आहे. यात शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बाजूच्या राज्यातून दुप्पट रक्कम लावून युरिया खरेदी करून आणावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे.

कृषी विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी यावर त्वरित कारवाई करावी, अशी जोरदार मागणीअवीसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम,ग्रापं वेंकटापुरचे सरपंच अजय आत्राम, ग्रापं सिरकोंडाचे सरपंच लक्ष्मण गावडे,ग्रापं गरकापेठाचे सूरज गावडे, ग्रापं असरअल्लीचे सरपंच रमेश तैनेनी,सरपंच सुशीला वेलादी, सरपंच शंकर वेलादी, सरपंच कौशल्य आत्राम, सरपंच अशोक हरी, उपसरपंच शेखर गणारपू, उपसरपंच वेंकटी दसरी माजी सरपंच वेंकन्ना ताल्ला, माजी उपसरपंच स्वामी रिक्कूला, माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम, ग्रापं सदस्य महेंद्र दुर्गम,व तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे. लवकरच युरिया उपलब्ध न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही अविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम व सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here