सातारातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लॉयड्सचा पुढाकार -कुटूंबांना आवश्यक किटचे वाटप

253

T NEWS मराठी नेटवर्क-
गडचिरोली (प्रतिनिधी)
मुसळधार पाऊस, पाण्याची वाढती पातळी, कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे़ कुटुंबे विस्थापित झाली आहेत़ त्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. या संकटाच्या काळात लोकांच्या पाठीशी उभे राहून, लॉईड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेडची सीएसआर शाखा असलेल्या लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशन (एलआयएफ) ने प्रत्यक्ष मदत कार्यात पुढाकार घेतला आहे.
२५ ऑगस्टपासून एलआयएफ टीमने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी ३,००० हून अधिक आवश्यक मदत किट तयार केले आहेत. काळजीपूर्वक तयार करण्यात आलेल्या प्रत्येक किट मध्ये ब्लँकेट, तांदूळ, तेल, डाळ, कणिक, मसाले, साबण, टूथपेस्ट आणि पिण्याच्या पाण्याचे कॅन यासारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू समाविष्ट आहेत. पुरामुळे बाधित कुटुंबांना अत्यंत आवश्यक असलेला आधार देणे हा या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यामागचा उद्देश आहे.

२५४६ क्रेट रवाना-
१ सप्टेंबरपर्यंत, १२ ट्रकमध्ये भरलेले एकूण २,५४६ क्रेट नागपूरहून साताऱ्यातील पाटण तालुक्यात पाठवण्यात आले आहेत़ जेणेकरून पूरग्रस्त भागात मदत साहित्य जलदगतीने पोहोचेल. कोनसरी येथील लॉईड्स मेटल्सची सीएसआर टीम सातारा जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन आणि अधिकाऱ्यांसोबत बाधित लोकांना मदत साहित्याचे वेळेवर वितरण सुनिश्चित करत आहे.

कठीण काळात पाठिशी उभे राहण्यास प्राधान्य –
या उपक्रमाबद्दल बोलताना एलआयएफच्या प्रतिनिधीने सांगितले की, “लोकांच्या सर्वात कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हेच आमचे प्राधान्य आहे. सातारा जिल्ह्यातील कुटुंबांना मदत करण्यासाठी हे एक छोटेसे पाऊल आहे आणि आमची टीम गरजूंना मदत करण्यास तत्पर राहील. कठीण परिस्थितीत लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशनने नेहमीच लोकांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केले आहे. संवेदनशीलता आणि जबाबदारीने समुदायांना मदत करण्यास एलआयएफ वचनबद्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here