सागवान लठ्याची तस्करी फसली -१० सागवान लठ्यासह 6.28 लाखाचा मुद्देमाल जप्त; आसरअल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयाची कारवाई

744

T NEWS मराठी नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
सागवानाची अवैधरित्या तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच सिरोंचा वनविभागाच्या आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील वनकर्मचा-यांनी सापळा रचून एका चारचाकी वाहनासह १० सावागन लठ्ठे जप्त करून सागवान तस्करीचा पर्दाफाश केल्याची कारवाई गुरुवारी (दि़ ४) पहाटेच्या सुमारास कोपेला-सोमनपल्ली जंगलात केली़ विशेष म्हणजे, सदर तस्करीसाठी वापरण्यात आलेले वाहन तेलंगाणा राज्यातील आहे़ यावरून सिरोंचातील सागवान तेलंगाणा राज्यात तस्करी होत असल्याची बाब पुन्हा एकदा उघड झाली आहे़
प्राप्त माहितीनुसार, सिरोंचा वनविभागाच्या आसरअल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येणा-या कोपेला-सोमनपल्लीच्या जंगलातून सागवान तस्करी होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली़ या माहितीवरुन वनपथकाने आज पहाटेच्या सुमारास सदर परिसरात सापळा रचला़ दरम्यान, टीएस १२ युबी ३२६२ क्रमांकाचे चारचाकी वाहन सागवान लठ्ठे भरून येताना दिसताच वनपथकाने त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला़ मात्र वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला़ वनकर्मचा-यांच्या सतर्कतेने वाहन ताब्यात घेण्यात आले़ तपासणी केली असता, १० सागवान लठ्ठे आढळून आले़ वनविभागाने चारचाकी वाहन व सागवान असा एकूण ६.२८ लाखाचा मुद्देमाल जप्त केला़ चौकशीत आरोपी रमेश सत्यनारायण कैरोजू रा़ आझमनगर जि़ भोपालपल्ली (तेलंगाणा) याने गुन्ह्याची कबुली दिल़ त्याच्यावर वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला़ सदर कारवाई सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक एस़ नवकिशोर रेड्डी, उपविभागीय वनाधिकारी अक्षय मिना यांच्या मार्गदर्शनाखाली आसरअल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस़ जी़ सुरपाम यांच्या नेतृत्वात वन कर्मचा-यांनी पार पाडली़

दोन महिन्यात दोनदा तस्करी-
अवैध सागवान तस्करीची ही पहिलीच घटना नसून मागील महिन्यात सुद्धा बोलेरो वाहनातून सागवान तस्करी करताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आले होते़ त्यावेळेस ५.३ लाखाचा मुद्देमा जप्त करण्यात आला होता़ सागवान तस्करीची सलग दोन प्रकरणे उजेडात आल्याने जंगलातील वृक्षतोड होत असताना वनकर्मचारी आणि अधिकारी नेमके काय करतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here