


अहेरी (प्रतिनिधी)
महागाव व देवलमारी जिल्हा परिषद क्षेत्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून रविंद्र बाबा आत्राम यांना जिल्हा परिषद उमेदवारी देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

स्थानिक कार्यकर्ते, सरपंच–उपसरपंच, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक यांनी एकमुखाने रविंद्र बाबा आत्राम हेच योग्य, अनुभवी आणि सक्षम नेतृत्व” असल्याचे मत व्यक्त करत, त्यांना जिल्हा परिषदेसाठी तिकीट देण्याची ठाम मागणी केली आहे.रविंद्र बाबा आत्राम हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे प्रश्न, स्थानिक समस्या, विकासकामे आणि समाजकार्यात सातत्याने अग्रस्थानी राहिले आहेत. त्यांची तात्काळ कार्यशैली, सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि लोकांपर्यंत सहज पोहोचण्याची क्षमता यामुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे,माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे बंधू असलेल्या मा. रविंद्र बाबा आत्राम यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी गावकरी, प्रतिष्ठित नागरिक, सरपंच–उपसरपंच, महायुतीतील विविध पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्त्यांकडून सातत्याने केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर दिनाचेरपल्ली चातु पेरकी, दिनाचेरपल्ली ग्रामपंचायत सदस्य महेंद्र इष्टाम, तसेच दब्बाजी यांनी देखील *मा. रविंद्र बाबा आत्राम यांना जिल्हा परिषद उमेदवारी देण्यात यावी, अशी प्रबळ मागणी नोंदवली आहे.
जनतेचा आवाज, कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मजबूत नेतृत्वाची आवश्यकता लक्षात घेता या मागणीला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून संपूर्ण राजकीय वर्तुळात या घडामोडींवर चर्चा रंगल्या आहेत.आता पक्षपातळीवर या महत्त्वाच्या मागणीवर लवकरच सकारात्मक व निर्णायक निर्णय होईल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.


























