अल्पवयीन मुलीसह परप्रांतीय आरोपीचा लागला छडा -उत्तरप्रदेशातील रेल्वे स्थानकावरुन घेतले ताब्यात

261

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
गडचिरोली(प्रतिनिधी )
परप्रांतीय युवकाने धानोरा शहरातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविल्याची तक्रार 27 मे रोजी संबंधित मुलीच्या आईने धानोरा पोलिसात दिली होती. आरोपी परप्रांतीय असल्याने धानोरा पोलिसांनी युद्धस्तरावर चौकशी करीत अवघ्या 24 तासात आरोपीसह अल्पवयीन मुलीचा छडा लावला. परप्रांतीय आरोपीसह अल्पवयीन मुलीला उत्तरप्रदेशातील मेरठ सिटी येथील रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपीस पोस्को कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन धानोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होताच पोलिस उपनिरीक्षक स्वरुपा नाईकवाडे यांनी तपासाची चक्रे फिरविली. आरोपी परप्रांतीय असल्याने मुलीच्या आईवडिलांची सविस्तर विचारपूस केली असता संशयित आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन शोधण्यात आले. शेवटच्या लोकेशननुसार आरोपी नागपूरवरून छत्तीसगड एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करीत असल्याचे दिसून आले. सदर रेल्वे मेरठ सिटी उत्तर प्रदेश येथे जात असल्याची माहिती मिळताच आरोपीसह पळवून नेलेली मुलगी असण्याची संशय बळावल्याने याची मोहिती धानोरा प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक धुळे यांनी वरिष्ठांनी दिली. वरिष्ठांच्या आदेशानुसार धानोरा पोलिसांची पथक 28 मे रोजी वाहनाने थेट उत्तर प्रदेशातील मेरठ येथे पोहचले. गडचिरोली सायबर पोलिसांच्या मदतीने संबंधित अल्पवीय मुलीस आरोपीस रेल्वेस्थानाकावरुन ताब्यात घेण्यात आले. आरोपीस व मुलीसह धानोरा पोलिस ठाणे गाठित मुलला आईवडिलांच्या सुपूर्द करण्यात आले. तर आरोपीवर भादवि 376(2)(j), 376(3) सहकलम 4,6 पॉक्सोअंतर्गत अटक करण्यात आली आहे. पुढील तपास धानोरा पोलिस वरिष्ठांच्या नेतृत्वात पोउपनि स्वरूपा नाईकवाडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here