मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती -सिरोंचा -भामरागड तालुक्यातील अनेक गावाचा संपर्क तुटला

673

 

गडचिरोली (प्रतिनिधी ) जिल्ह्यात रविवारी आलेल्या जोरदार पावसाने (Hevy Rainfall )भामरागडजवळील पार्लकोटा व सिरोंचा तालुक्यातून वाहणाऱ्या इंद्रवती नदीला(Revar) पूर येऊन भामरागड येथील 50 कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून सिरोंचा तालुक्यातील कर्जेली गावात पाणी आले असून पातागुडम व असरअली मार्ग बंद असून अनेक गावांची संपर्क तुटला आहे.

(Hevy Rainfall )मुसळधार पावसामुळे आलापल्ली-भामरागड महामार्ग पाण्याखाली गेला. तसेच अनेक दुकानांत पाणी शिरले. त्यामुळे साहित्य तातडीने दुसरीकडे हलवण्यात आले. प्रशासनाने तत्परता दाखवत डॉ. आंबेडकर वॉर्डातील ५० कुटुंबांना स्थलांतरित केले. मुलचेरा-आष्टी, आलापल्ली- भामरागड,आलापल्ली-सिरोंचा हे मार्ग पाण्याखाली गेले. गडचिरोलीत सरासरी ४७.२ मि.मी. पावसाची नोंद झाली असली तरी एकट्या भामरागड तालुक्यात १७४. ५ मि.मी. इतका पाऊस पडला.जिल्ह्यातील नदी कठावर असलेल्या गावांना(alert )सतर्क राहण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आल्याची माहिती मिळाली असून जिल्ह्यात सुदूर अतिवृष्टी झालेली आहे.शासनाकडून आकडेवारी घेणे सुरू आहे. तसेच गोसेखुर्द मधून सुद्धा विसर्ग वाढविण्यात आलेअसून आतापर्यन्त (1.18 लक्ष cusecs) पाणी सोडले असून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती बाबत प्रशासन आवश्यक कार्यवाही करीत असून स्थानिक पातळीवर स्थलांतरण कार्यवाही सुरू आहे.सिरोंचा तालुक्यातील कोरला, सोमनपल्ली,कर्जेली गावात पाणी आले असून या तिन्ही गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

आसरा फाउंडेशनच्या मदतीने दुचाकीसह वाहून गेलेले दोन अधिकारी सुरक्षित –
भामरागडहून एटापल्लीकडे दुचाकीने जात असताना मुसळधार पावसामुळे ताडगावजवळ वटेली नाल्यावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. यामुळे पशुधन विकास अधिकारी नितीन विजयकुमार काळे (३०, रा. तोडसा) व बँक अधिकारी तिरुपती शंकर चापले (३०, रा. पंदेवाही) हे दोघे दुचाकीसह वाहून गेले. १०० फूट अंतरावर एका झाडाच्या फांदीला पकडून दोघांनी मदतीसाठी याचना केली.(Asara Faundetion)आसरा फाऊंडेशनचे शंकर हलदार, प्रकाश आत्राम, सुनील मडावी, मनोज महालदार, किंकर मिरदा यांनी त्यांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here