



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
चंद्रपूर(प्रतिनिधी) NEET परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या चंद्रपूर शहरातील इन्स्पायर कोचिंग क्लासेसच्या विध्यार्थिनीने वसतिगृहात आत्महत्या(Suicide)केल्याची धक्कादायक घटना बुधवारी, 11 सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहरात उघडकीस आली आहे. प्रांजली राजूरकर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. वसतिगृहात प्रांजलीच्या आत्महत्येने शहरात खळबळ उडाली आहे.
शहरातील सुप्रसिद्ध इन्स्पायर कोचिंग क्लासेस येथे नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रांजली राजूरकर हिनी वसतिगृहातील तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रांजली ही यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील रहिवासी आहे. बारावीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी तिने चंद्रपूर शहरातील इन्स्पायर कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. प्रांजली नीट परीक्षेची तयारी करत होती.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही, घटनेचा अधिक तपास रामनगर पोलीस (RamNagar Police)करीत आहेत.






























