



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी )-चिमूरचे लोकप्रिय नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेराव किरसान (MP NAMDEV KIRSAN )यांचा मंगळवार, 10 सप्टेंबर सिरोंचा(sironcha) तालुक्याचा दौरा केला. दरम्यान त्यांनी स्थानिक महसूल भवन येथे विशेष आढावा बैठक घेत तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा घडवून आणली.

या बैठकीत तालुक्याच्या विविध समस्या व विकासकामाबाबत चर्चा करण्यात आली असून यामध्ये प्रामुख्याने सिरोंचा -आलापल्ली महामार्ग, आरोग्य समस्या आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज समस्या तसेच बीएसएनएल(BSNL )नेटवर्क सुरळीत करून सिरोंचा येथे 5G सेवा सुरु करण्यावर चर्चा करण्यात आली. तसेच सिरोंचा येथील जयस्तंभ चौकात खासदार किरसान यांच्या तालुका कॉंग्रेस कमेटी(Taluka Congress Comitee )तर्फे दुपारी 12 वाजता सत्कार करण्यात आला. सिरोंचा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांनी दिली आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असून यामध्ये काँग्रेस कमेटी जिल्हाअध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार पेंटाराम तलांडी, माजी जि. प. अध्यक्ष तथा विधानसभा समन्वयक अजय कंकडालवार, आदिवासी कॉंग्रेस सेल जिल्हाध्यक्ष हणमंतू मडावी, जिल्हा उपाध्यक्ष मुस्ताक हकीम, माजी सभापती सगुणा तलांडी, न. पं. अध्यक्ष शेख फर्जाना, उपाध्यक्ष बबलू पाशा, जेष्ठ कॉंग्रेस नेते के. ब्रह्मनणंद, शंकर पुपाल्लवार, अहेमद अली, आविसं सिरोंचा तालुकाध्यक्ष तथा काँग्रेस नेते बानय्या जनगाम आदी उपस्थित होते. महाविकास आघाडी व काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, शेतकरी बांधव महिला भगिनी, नागरिक व कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


























