नवनियुक्त तहसीलदार निलेश होनमारे यांच्या काँग्रेस तर्फे सत्कार -तालुक्यातील समस्याबाबत चर्चा

102

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी): सिरोंचा येथील तहसील कार्यालयात नुकतेच रुजू झालेल्या तहसीलदार निलेश होनमारे यांच्या तालुका कांग्रेस कमेटीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तालुका काँग्रेस कॉमेटीचे अध्यक्ष सतीश जवाजी यांनी तहसीलदार यांना सिरोंचा तालुक्यातील अनेक समस्यांबाबत माहिती दिली.तसेच समस्या शासन स्तरावर पोहोचवून त्यांचे निराकरण करण्याची विनंती केली.नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार यांनी तालुक्याच्या विकासासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष सतीश जवाजी,नायब तहसीलदार सय्यद हमीद, सामाजिक कार्यकर्ता निताताई तलांडी,माजी सरपंच रवीभाऊ सल्लम,जेष्ठ कांग्रेस नेते एम.ए अली,एससी.सेल तालुकाध्यक्ष सारय्या सोनारी,अमडेली सरपंच सुरेश मडे, युवा कांग्रेस माजिद अली,मंचरला गणपतीसह कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here