


सिरोंचा(प्रतिनिधी)भारताचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सिरोंचा येथील महायुती वतीने ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथील रुग्णांना फळ व बिस्किट वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला.
महायुतीचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ:-धर्मराव बाबा आत्राम यांचे पुढाकार व सूचनेनुसार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आले.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सत्यनारायण मंचालवार,दामोदर अरीगेला,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीश गंजीवार, नगर सेवक सतीश भोगे,नगर सेवक सतीश राचर्लावार,फाजील पाशा,नगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हा उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी आरवेल्ली,ओमप्रकाश ताटीकोंडावार, नागभूषण चकिनारपूवार,संगेम लक्ष्मण अमित तिपट्टीवार,रवी चकिनारपूवार,सालार सय्यद,शरिक शेख,जुगुनु शेख,रवि सुलतान,संजू पेद्दापल्ली,कुंदारपू गट्टू,प्रशांत गादम, व्यंकट मिस्त्री,महेश गादम,विज्जू बंदेला,
शंकर तडकापल्ली,श्याम मुत्तूनुरी,आदी मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते….



























