ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तालुकाध्यक्ष पदी पोचम कोलगुरी

507

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी )महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तालुका शाखा सिरोंचाच्या वतीने गठित करण्यात आलेल्या कार्यकारिणीत युनियनच्या तालुकाध्यक्षपदी पोचम दुर्गय्या कोलगुरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
स्थानिक विठ्ठलेश्वर मंदिराच्या आवारात 20 ऑक्टोबर रोजी संघटनेची तालुकास्तरीय सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मारोती पुल्लीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी तालुक्याची कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात तालुकाध्यक्ष म्हणून पोचम दुर्गय्या कोलगुरी यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. सचिव सुरेश नागोडी, उपाध्यक्ष मलय्या अट्टेला, कार्याध्यक्ष राजेश गौतम, सहसचिव बापू पोटलपेल्ली, सल्लागार नागेश देनाबोईना, संघटक नागराज गोमासी, प्रसिद्धी प्रमुख सुमन जक्कुला तर सदस्यपदी श्रीमेन माडेम, अनुराधा गुरूनुले, राकेश लाटकरी, सीनू सिरंगी, रमेश जनगाम, संजय बिरदूवार, संतोष दुर्गम, साजन कुमरी, समय्या गज्जेला, वेंकटी गावडे यांची तालुका ग्रामपंचायत युनियनच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. निवनियुक्त पदाधिका-यांचे अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here