


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
धानोरा (प्रतिनिधी )
स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या 56 वर्षीय तलाठ्याने दोन अल्पवयीन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना 27 ऑक्टोबरला धानोरा पोलिस ठाणे हद्दीत उघडकीस आली. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्यास बेड्या ठोकल्या. शंभू मुरारी आतला (56) असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर तलाठ्याने प्रकृतीच्या कारणास्तव दोन वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. तो दुमजली घर बांधून पत्नीसमवेत राहत होता. त्याची पत्नी व मुले बाहेरगावी गेले होते. त्यामुळे तो 26 ऑक्टोबर रोजी घरी एकटाच होता. घराजवळ अंदाजे सहा व नऊ वर्षीय मुली खेळत होत्या. त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांना घरात नेले व त्यांच्याशी कुकर्म केले.

रात्री उशिरा ठोकल्या बेड्या-
दोन मुलींपैकी एका मुलीचा भाऊ बहिणीच्या शोधात बाहेर आला. शंभू आतला याच्या घरातून बहिणीचा ओरडण्याचा आवाज आल्याने त्याने तिकडे धाव घेतली. हा सगळा घृणास्पद प्रकार पाहिला. त्यानंतर त्याने आरडाओरड केली. रात्री उशिरा गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी शंभू आतला यास बेड्या ठोकल्या.






























