अखेर रेगुंटा परिसरातील १९ गावातील नागरिकांना नदी घाटापर्यंत जाण्यासाठी मार्ग झाला सुखकर -धर्मराव बाबा आत्राम यांच्या आर्थिक सहाय्याने केला मार्ग

171

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –

सिरोंचा (प्रतिनिधी )तालुक्यातील रेगुंटा परिसरातील १९ गावातील नागरिकांना तेलंगणा राज्याला जाण्यासाठी नदी घाटापर्यंत मार्ग आहे मात्र टेकडीवरून उतरण्यासाठी मार्ग अतिशय खराब खड्डेमय अवस्थेत होती
लोकांना चड-उतर करण्यासाठी तसेच समान आणण्यास अडचण आत्ता थेट जाण्यास मार्ग मोकळा झाला आहे
येथील होत असलेली अडचण,समस्या रेगुंटा येथील कार्यकर्त्यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना माहिती दिली असता मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी तात्काळ त्या कार्यकर्त्यांना मार्ग सुरू करण्यास आदेश दिले. अखेर रेगुंठा परिसरातील १९ गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मार्ग तयार करून दिल्यानंतर लोकांनी मंत्री धर्मराव बाबा प्रति आभार व्यक्त करत तसेच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनाच परत एकदा निवडून आणणार अशी लोकांनी सांगितले
टेकडीवर मार्ग खराब असल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता तेलंगणात ये-जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने या ठिकाणी दुचाकी व इतर मोठे वाहने टेकडीवरून खाली उतरण्यास अडचण निर्माण होत होती अनेक दुचाकी नियंत्रण सुटून खाली पडून दुखपात झाले होते ही अडचण समस्या रेगुंठा येथील कार्यकर्त्यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना माहिती देताच मार्ग सुरू करण्याच्या आर्थिक मदत करून कार्यकर्त्यांना मार्ग सुरू करण्यास आदेश दिले त्यानंतर २७ ऑक्टोंबर रोजी कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरचा सहाय्याने मार्ग सुरू करण्यात आली आहे
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकर कल्लूरी,सिरोंचा नगर पंचायत चे नगर सेवक सतीश राचर्लावार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण निलम,राजेशम शेट्टीवार,रमेश मानेम,शिवय्या जाडी,सरशील अकनपल्लीवार,पुरुषोत्तम कडार्लावार,राजू कडार्लावार,संजय आत्राम,मल्लेश गंपा,समय्या बोल्ले,अधिक कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here