एस. नवकिशोर रेड्डी यांनी स्विकारला उपवनसंरक्षक पदाचा पदभार -राकॉं पदाधिका-यांतर्फे सत्कार

256

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक पूनम पाटे यांच्या बदली झाली असून त्यांच्या रिक्त पदावर उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांच्या नियुक्ती झाली असून नुकताच त्यांच्या पदाचा पदभार स्विकारला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) पदाधिका-यांनी कार्यालय गाठित नवनियुक्त उपवनसंरक्षकांचा सत्कार करीत अभिनंदन केले.
सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक म्हणून शासनाने नुकताच नवकिशोर रेड्डी यांची नियुक्ती केली. ते नुकताच रुजू झाले असून वनिवभागाचा कामकाज हाती घेतला आहे. कर्तव्यतत्पर व समाजभिमूख अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी पदभार स्विकारताच राकॉं तालुका पदाधिका-यांनी त्यांची भेट घेत श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पदाधिका-यांनी सिरोंचा वन विभागामुळे तालुक्यात रखडलेले विकासात्मक कामे, प्रलंबित वनहक्क दावे आदींवर चर्चा करीत सदर प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याची मागणी करण्यात आली. यावर उपवनसंरक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी राकॉँ तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, माजी नगरसेवक रवी रालाबंडीवार, कंत्राटदार वेंकटेश पुजारी, रमेश मानेम, उपसरपंच नागराज गणपती, ताटीकोंडावार, सत्यनारायण चिलकामारी, हुसेन शेख, एम. डी. शानू आदींसह इतर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here